PMPL च्या पास केंद्रावर प्रवाशी पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून सोमवार पासुन महामंडळाच्या सर्व ४० पास केंद्रावर प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये १ ऑक्टोबर २०२३ पासुन सर्व बसेस मध्ये ई – तिकीट मशीन मध्ये तिकीट काढून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्याला प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

१ ऑक्टोबर. ते २० ऑक्टोबर २०२३ याकालावधीत महामंडळाला रक्कम रुपये १९,४९,४००/- इतके उत्पन्न मिळाले असून ७३,७२८ तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. तर ८९,३६८ प्रवाशांनी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) तिकीट काढली आहेत

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या  सर्व पास विविध प्रकारच्या पासेसची विक्री केली जाते. महामंडळास महिन्यातून सरासरी पास विक्रीतून ५ कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त होत असते तर सरासरी ६० हजार पासची विक्री होत असते.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ रोजी शुभारंभ होणार आहे. तरी पास काढण्यासाठी सर्व नागरिकांनी कॅशलेस सुविधेचा वापर करून पेमेंट करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन
महामंडळाकडून करण्यात येत आहे.

या पद्धतीने होणार कॅशलेस पेमेंट

1. पास केंद्रावरील सेवकास ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करणे.
2. क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करणे.
3. पास केंद्रावरील सेवकांकडून पास प्राप्त करणे.

Latest News