निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो प्रस्तावाला केंद्राची मान्यता


पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते फुगेवाडी असा मेट्रो मार्ग न ठेवता निगडी ते फुगेवाडी ( Pimpri ) असा मेट्रो मार्ग असावा, अशी मागणी शहरातील सामाजिक, राजकीय संघटना व नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. तथापि, त्यासाठी प्रस्तावित खर्चात नाममात्र वाढ होणार होती.मागील सहा वर्षापासून अखंडितपणे ही मागणी करण्यात येत आहे.
निगडी पर्यंत विस्तारीकरण करण्याच्या प्रस्तावला केंद्रसरकारने मंजुरी दिली आहे. मेट्रो मार्गिकेच्या आधीच्या खर्चाच्या तुलनेत आता सुमारे तिप्पट खर्च येणार आहे. या मेट्रो मार्गाचे निगडी पर्यंत विस्तारीकरण करावे,
महापालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडे विविध माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.त्यानुसार विविध स्तरावर या विस्तारीकरणाच्या मागणीला मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा प्रश्नावरचा विजय हा कोणत्याही एका राजकीय अथवा सामाजिक संस्थेचा नसून तो लोकांच्या एकतेचा आणि लोकचळवळीचा विजय आहे.
मेट्रोचे जाळे पिंपरी नव्हे तर निगडी पर्यंत असावे मागणीसाठी माघील 6 वर्षांपासून शहरातील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने लोकचळवळ उभारण्यात आली होती. त्या चळवळीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने सर्वत्र आनंदचे वातावरण निर्माण झाले आहे
. या पार्श्वभूमीवर उद्या दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता शहरातील सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या वतीने मोरवाडी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.