श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये मंगळवार दि.24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये भव्य 70 फुटी रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पिंपरी येथील (Pimpri) श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानामध्ये भव्य रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.24 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी 70 फुटी रावण, कुंभकर्ण, मेघनाथ यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त (Pimpri) शेखर सिंह व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते रावण दहन केले जाणार आहे.तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये LED डान्स ग्रुप दिल्ली, झिरो ग्रॅव्हीटी डान्स ग्रुप मुंबई, लावणी, बेली डान्स, फायर डान्स आदि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. अशी माहिती वाघेरे यांनी दिली.