खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांकडून अटक

IMG_20231030_110222

खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांकडून अटक

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाच सामना | जुन्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून जिवे मारण्याच्या हेतूने कोयत्याने वार करून हतातील कोयते, बांबू हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. हा प्रकार 25 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता बालाजीनगर येथील शिळमकर पेट्रोल पंपाजवळ घडला होता. दाखल गुन्ह्यात फरार आरोपी सलमान उर्फ सल्या शेख याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे यांना माहिती मिळाली की, गुन्ह्यात फरार असलेला आरोपी सल्या शेख हा घातक हत्यारासह के.के. मार्केट येथील पेट्रोल पंपाजवळ कोणाची तरी वाट पाहत असून गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कोयता आढळून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत साथीदार बबलू कोठारी, सनी जाधव यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहें .सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे करीत आहेत.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र मळाले पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, सुशांत फरांदे,निलेश शिवतारे, संजय गायकवाड, महेश मंडलिक, सागर सुतकर, बजरंग पवार,नवनाथ शिंदे, भुजंग इंगळे, सागर कुंभार, विशाल वाघ यांच्या पथकाने केली.

Latest News