‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद


…. …………….
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘लक्ष्य’ या नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेने हा कार्यक्रम प्रस्तुत केला.या कार्यक्रमात श्रीता आंबेकर(कुचिपुडी),अमीरा पाटणकर(कथक) आणि दिल्लीच्या अरुपा लाहिरी ( भरतनाट्यम ) यांनी बहारदार नृत्य सादर केले.
हा कार्यक्रम रविवार, २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १८७ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना शमा भाटे, मनिषा साठे तसेच रवींद्र दुर्वे, मंजिरी कारुळकर हे मान्यवर उपस्थित होते. नृपा सोमण यांनी सूत्रसंचालन केले. पुणेकर रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला.