आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना लीला पूनावाला फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्ती

lila-foundation
photos by google

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

– लीला पूनावाला फाउंडेशन (LPF) ने पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये 1,600 पेक्षा अधिक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या गरजू मुलींना गुणवत्ता आणि गरज आधारित शिष्यवृत्ती दिली

.या शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींपैकी 1,300 हून (Pune)अधिक मुली अभियांत्रिकी, डिप्लोमा नंतर अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, विज्ञान या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. 260 हून अधिक मुली शाळांमध्ये 7 वी इयत्तेत शिकत आहेत असून त्या पदवीपर्यंत त्यांचे शिक्षण सुरू ठेवतील. त्यांना लीला पूनावाला फाउंडेशन आर्थिक पाठिंबा देणार आहे.

पुणे, वर्धा, अमरावती, नागपूर, हैदराबाद आणि बेंगळुरू या प्रदेशांमध्ये यावर्षी दहा शिष्यवृत्ती पुरस्कार प्रदान समारंभ झाले.

एलपीएफच्या अध्यक्षा पद्मश्री लीला पूनावाला, विश्वस्त फिरोज पूनावाला, सदस्य – डा. मेहता आणि विनिता देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिती खरे आणि एलपीएफची लीडरशिप टीम ,कॉर्पोरेट भागीदार, देणगीदार, शिष्यवृत्ती निवड समिती सदस्य, हितचिंतक यांच्या हस्ते मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Latest News