पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीची वार्षिक परिषद आजपासून


पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीची वार्षिक परिषद आजपासून*
पुणे :पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीची ‘पी.ओ.एस. स्पेक्ट्रम २०२३’ ही १६ वी वार्षिक परिषद आजपासून पुण्यात सुरु होत आहे.दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हॉटेल शेरेटन ग्रँड येथे या दोन दिवसीय परिषदेचे उदघाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर तसेच डॉ.संतोष होनावार,डॉ.संतोष अगरवाल यांच्याहस्ते होणार आहे.
परिषदेत नेत्ररोग,नेत्र शल्यचिकित्सा,आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून संशोधनपर निबंध सादर करण्यात येणार आहेत. पूना ऑफ्थल्मॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मंदार परांजपे,सचिव डॉ. सागर वर्धमाने,खजिनदार डॉ.पंकज बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. उदघाटन सत्रात डॉ.अरविंद लाभशेटवार यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.ते गेली ४५ वर्षे नेत्रशल्य चिकित्सा क्षेत्रात कार्यरत आहेत. —