BSP पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी पदी डॉ. हुलगेश चलवादी


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख भगिनी मायावती जी यांनी आगामी लोकसभा 2024 निवडणुकीच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून डॉ. हुलगेश चलवाडी यांची नियुक्ती केली आहे.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक लखनौ, उत्तर प्रदेश येथे बहन मायावती जी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी डॉ.हुलगेश चलवाडी, सुदीप जी गायकवाड, काळूराम चौधरी, आप्पासाहेब लोकरे यांना देण्यात आली आहे.