आमदार सुनिल शेळके यांनी महाराष्ट्रातील जनतेला हेतु परस्पर दिलेल्या चुकीच्या माहिती बदल्यात लेखी माफी मागून राजीनामा देणार का ?

Backup_of_ps logo rgb

आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी ०९ तारखेला नागपूर येथे अनेक पत्रकारांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना, तसेच महाराष्ट्रातील जनतेला हेतु परस्पर दिलेल्या चुकीच्या माहिती बदल्यात लेखी माफी मागून राजीनामा देणार का ?

(पुणे ::ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मावळमध्ये कोरियन कंपन्यांनी जमिनी खरेदी करताना शासकीय नियमानुसार खरेदी केलेली आहे. परंतु मावळचे आमदार सुनिल शंकरराव शेळके यांनी पत्रकारांच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व मा. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे.

मूळ जागा मालकांचा काही संबंध नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आमदार सुनिल शंकरराव शेळके करत आहेत, तसेच कोरियन कंपन्यांची जागा ही वनीकरण क्षेत्रांमध्ये असल्याची खोटी माहिती देखील त्यावेळेस त्यांनी दिली. लोकप्रतिनिधींनी पीएमआरडीए शी पत्रव्यवहार व मीटिंग घेऊन अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी दबाव आणला असे समजले. त्यास अनुसरून दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी कोरियन कंपनीचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीए चे अधिकारी व त्यांचे पथक त्या ठिकाणी आले होते

त्यावेळेस स्थानिक प्रतिनिधी, रहिवाशी व कामगार यांचा तीव्र विरोध, जागामालक व कंपनी ने मा. हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवरती स्थगिती मिळाली असल्याने पीएमआरडीए चे पथक माघारी गेले.

संदर्भित कोरियन कंपनीला दिलेल्या प्लॉटमध्ये जागामालकांनी ठरल्या प्रमाणे जागा विक्री अगोदर बांधकाम नकाशे मंजूर करून दिलेले आहेत.

संदर्भित बांधकाम करून देण्यामध्ये जागा मालकांचा काहीही संबंध नाही. प्लॉट ए, बी, सी मध्ये कंपन्या असून प्लॉट डी व वनीकरण भाग विकलेला नाही. त्या कंपन्यांनी अंदाजे २००० कोटी रुपयाची गुंतवणूक केलेली असून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या एकूण ४००० रोजगार निर्मिती केलेली आहे.

आमदार सुनिल शेळके यांनी सर्व जनतेला, मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री यांना हेतु परस्पर खोटी माहिती दिल्या मुळे आमदारकी चा राजीनामा देणार का? तसेच जागा मालक यांची जाहीर लेखी माफी मागणार का?

२) आमदार सुनिल शेळके यांनी केलेले गैर वर्तवणूक तसेच त्याबद्दल माफी :

संदर्भित कोरियन कंपन्यांना दिलेल्या क्षेत्रा मधील काही क्षेत्र हे पूर्वी आमदार सुनिल शंकरराव शेळके यांचे बंधु सुदाम शंकरराव शेळके यांच्या मालकीचे होते. कंपन्यांचे बांधकाम है वनीकरण क्षेत्रात नाही ही माहिती असून देखील जागा मालकांची बदनामी आमदार सुनिल शेळके का करत आहेत? .

या खोटारडे पणाबद्दल, सुडबुद्धिबद्दल, सामाजिक तेढ निर्माण होईल अशी परिस्थिति निर्माण केल्या बद्दल, मावळ व महाराष्ट्राचे नाव खराब केल्याबद्दल आमदार पदाचा व त्यावरील विश्वासाचा गैर फायदा घेऊन प्रशासन, राज्यकर्ते, जनता, जागा मालक व कंपन्या या सर्वांची आमदार सुनिल शंकरराव शेळके हे जाहीर लेखी माफी मागून व आमदारकीचा राजीनामा देणार का ?

३) नातेवाईकांच्या हितासाठी :

गाव मौजे चाकण तर्फे नाणोली, ता. मावळ येथील गट नंबर 71,102, 103, 104, 105, 108, 109, 110, 111, 112, 113, 115, 116, 136, 138, 139, 141, 142 या गटांवर बेकायदेशीर उत्खनन गेल्या काही महिने चालू असून त्यावर वारंवार तक्रारी करून अद्यापही काही दखल नाही

. या उत्खननामध्ये आमदार पदाचा गैर वापर करून नातेवाईकांच्या हितासाठी शेकडो झाडांची विना परवानगी तोड झाली असून लाखो रुपयांची रॉयल्टी बुडवून प्रशासनाची व वनविभागाची फसवणूक करण्यात आली आहे.

हे सर्व गट नंबर कोणाच्या मालकीचे आहेत व या सर्व बेकायदेशीर कामांना कोणाचा पाठिंबा आहे? याची देखील चौकशी त्याच तत्परतेने करण्यात यावी. तसेच या गट नंबर मधील काही भाग वनीकरणत असून या मध्ये देखील बेकायदेशीर उत्खनन व शेकडो वृक्ष तोड करण्यात आलेली असून यावर आमदार सुनिल शंकरसव शेळके हे तत्परतेने पाठ पुरावा करून दंडात्मक कार्यवाही करणार का ?

——————

Latest News