पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून राजकीय आरोप–प्रत्यारोप चव्हाट्यावर…

Backup_of_ps logo rgb

पिंपरी-चिंचवड : पुणे महानगरपालिकेने तिथली कुत्री पिंपरी चिंचवडमध्ये सोडल्याचे प्रकरणही पाटील यांनी पुन्हा उचलून धरले. “शहराचे कारभारी म्हणून तुम्हीच जबाबदार असताना पुण्यातील कुत्री भोसरी मतदारसंघात आणून सोडली गेली. तेव्हा तुम्ही कुठे होता?” असा थेट सवाल त्यांनी लांडगे यांना केला.भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर आपण वेळोवेळी आवाज उठवला असून, डॉग शेल्टर उभारणीसाठीही महानगरपालिकेत पाठपुरावा केला, पण प्रशासन आणि सत्ताधारी उदासीन असल्याचा आरोप पाटील यांनी केला. “पायाभूत सुविधा उभारण्यापेक्षा भाजप नेत्यांना मलईखाण्यातच रस आहे,” असेही त्यांनी हल्लाबोल करताना म्हटले. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत महापालिका व भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरून राजकीय आरोप–प्रत्यारोप चव्हाट्यावर आले आहेत. मंगळवारी विधानसभेत आमदार महेश लांडगे यांनी नागपुरात या प्रश्नावर भाष्य केले.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत थेट आमदार लांडगे व भाजप सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.पाटील यांनी म्हटले की, “गेल्या आठ वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ता भाजपची आहे. महेशदादा स्वतः ११ वर्षांपासून आमदार आहेत. तरी आज शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे, तर त्याला जबाबदार कोण?” पाटील यांनी सांगितले की शहरातील नागरिक—लहान मुलांपासून महिलांपर्यंत आणि रात्री कामावरून परतणाऱ्या लोकांपर्यंत—भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला रोज सामोरे जात आहेत.कोरोना काळातील नसबंदी मोहिमेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कोरोना काळात ७,१२५ कुत्र्यांची नसबंदी झाल्याचा रिपोर्ट आहे. जेव्हा नागरिक घराबाहेर पडत नव्हते, त्यावेळी नसबंदी कसली झाली? ह्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट दिसते,” असा आरोप पाटील यांनी केला.

Latest News