काळेवाडी मधील विक्रांत वाईन शॉपवर कारवाई करा, आमदार शंकर जगताप यांचे अधिवेशनात हल्ला बोल: शहरातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार: युवराज दाखले

1005540353

पिंपरी ( ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या विक्रांत वाईन शॉपवर कारवाई करण्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्या बद्दल आमदार शंकर भाऊ जगताप यांचे आभार: मानले आहेत

पिंपरी -प्रतिनीधी, नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरातील सह्याद्री सोसायटीत नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या विक्रांत वाईन शॉपवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करून सभागृहाचे लक्ष वेधल्या बद्दल राहटणी काळेवाडी येथील माता भगिनींनच्या वतीने शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आमदार शंकर भाऊ जगताप यांचे प्रसिद्ध पत्रक काढून आभार मानले आहे. शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले आभार मानले आहेत

दरम्यान यावेळी आमदार शंकर भाऊ जगताप यांनी मांडलेले मुद्दे :सह्याद्री सोसायटीच्या इमारतीत कम्प्लिशन सर्टिफिकेट (OC) नसताना विक्रांत वाईन शॉप नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे.अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे या वाईन शॉपला मान्यता देण्यात आली आहे. अपूर्ण कागदपत्रांवर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी Without OC दुकान सुरू करण्यास दिलेली परवानगी याबाबत कारवाई होणार का?४ डिसेंबर २०२५ च्या सुनावणीत सदर FL-2 परवाना रद्द करण्याबाबत काय निर्णय झाला?अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले आहे ही कौतुकाची बाब आहे असं मत दाखले यांनी व्यक्त केले आहे.

Latest News