लिफ्ट ऑडिट कामकाजाचे जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण- आमदार शंकर जगताप

ps logo rgb

लिफ्ट दुर्घटनांबाबत आमदार शंकर जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले

पुणे जिल्ह्यातील सर्व ‘लिफ्ट’ची तांत्रिक तपासणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर

पुणे जिल्ह्यातील ६१ हजार ५२१ लिफ्टपैकी पाच महिन्यात ५ हजार ६९४ लिफ्टची तपासणी पूर्ण

लिफ्ट ऑडिटसाठी ५१९ कर्मचारी उपलब्ध ; लिफ्ट तपासणीचे होणार अधिक वेगाने

पिंपरी चिंचवड : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये वारंवार लिफ्ट दुर्घटना घडत आहेत. गृहप्रकल्पांमधील उदवाहन (लिफ्ट) अपघातांबाबत आमदार शंकर जगताप यांनी भोसरी चोवीसावाडी येथे दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या एका दुःखद घटनेकडे नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले. तारांकित प्रश्न विचारून सर्व हौसिंग सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी झाली आहे काय?, तसेच लिफ्टची तपासणी झालेली नसल्यास काय कारवाई करण्यात आली आहे? याची विचारणा केली आहे.आमदार जगताप यांनी विचारलेल्या या तारांकित प्रश्नांवर मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व लिफ्टच्या तांत्रिक तपासणीची कार्यवाही सुरू असून जिल्ह्यामध्ये लिफ्ट ऑडिट तातडीने आणि काटेकोरपणाने व्हावे यासाठी नवीन पदांची भरती करण्याबरोबरच लिफ्ट ऑडिट कामकाजाचे जिल्हास्तरीय विकेंद्रीकरण करण्यात आल्याचे उत्तरात नमूद केले आहे. सर्वसामान्यांच्या जीविताचा मोठा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे.

२ ऑक्टोबर २०२५ रोजी चोविसावाडी, चऱ्होली येथील राम स्मृती सोसायटीमध्ये १२ वर्षांच्या अमेय फडतरे ह्याचा दुर्दैवी मृत्यू लिफ्ट अपघातामुळे झाला. तसेच अनेक वेळा अशा दुर्घटना होत आहेत. याकडे मंगळवारी तारांकित प्रश्न द्वारे आमदार शंकर जगताप यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लिफ्टची नियमित तपासणी न केल्यामुळे सातत्याने प्राणहानी आणि गंभीर अपघात होत आहेत. “वारंवार घडणाऱ्या या अपघातांकडे दुर्लक्ष करणा ऱ्यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित असल्याचा मुद्दा आमदारांनी सभागृहात उपस्थित केला.

तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून आमदार शंकर जगताप यांनी शहरातील सर्व सोसायट्यांमधील लिफ्टची तपासणी करून प्रमाणित अहवाल सादर करावा. निकृष्ट व अप्रमाणित लिफ्ट त्वरित बंद करून शासनाच्या नियमावलीनुसार कारवाई करावी. नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकारी व बिल्डर्सवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी. प्रत्येक सोसायटीमध्ये प्रशिक्षित लिफ्टमनची नियुक्ती सक्तीची करावी. लिफ्ट सुरक्षिततेसंबंधी नागरिकांसाठी जनजागृती मोहीम राबवावी. पिंपरी चिंचवड शहरातील गृहप्रकल्पांतील लिफ्टच्या सुरक्षा ऑडिटसाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केलेली होती या मागणीच्या संदर्भात कोणती कार्यवाही केली अशी विचारणा आमदार जगताप यांनी सभागृहात केली.
..,……..

मुख्यमंत्र्यांकडून लेखी उत्तर

आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या या तारांकित प्रश्नांवर राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष अभियंत्यांनी भोसरी मतदारसंघात येणाऱ्या चोवीसावाडी दुर्घटनेतील लिफ्ट तपासणीची वस्तुस्थिती कळवलेली आहे. या प्रकरणाची ३ ऑक्टोबर २०२५ रोजी चौकशी करण्यात आली. अपघात झाल्यानंतर लिफ्ट लगेच बंद करण्यात आली आहे. लिफ्टमध्ये आढळलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत विद्युत निरीक्षकांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी गृहनिर्माण संस्थेला नोटीस दिली आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर आणि लेखी परवानगी मिळाल्यावरच लिफ्ट पुन्हा सुरू करता येईल असे नोटीसीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यात एकूण ६१ हजार ५२१ लिफ्ट आहेत, त्यापैकी जुलै ते नोव्हेंबर २०२५ या काळात ५,६९४ लिफ्टची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तपासण्या सुरू आहेत. जिल्ह्यातील लिफ्ट तपासणीचे काम जलद व्हावे म्हणून सरकारने हे काम जिल्हास्तरावर वाढवले आहे. यामुळे आधीच्या ७१ पदांच्या तुलनेत ५१९ कर्मचारी उपलब्ध झाले असून लिफ्ट तपासणीचे काम अधिक वेगाने होऊ शकते. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तराद्वारे व्यक्त केला आहे

……..

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी वारंवार लिफ्ट बाबत होत असलेल्या अपघातांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधले. लिफ्टची तांत्रिक तपासणी होऊन त्याबाबतचा अहवाल आणि मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होती. यानुसार राज्याचे मु…

Latest News