हडपसर मध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळत धिंड….

पुणे : शहरात कोयता गँगचा धुडगूस सुरू आहे. कोयते हातात घेऊन, गाड्यांची तोडफोड केल्याचे, दहशत माजवल्याच्या घटना वारंवार घडत आहे. पुणे पोलिसांनीही या कोयता गँग विरोधात कडक कारवाईस सुरूवात केली आहे.

शहरातील हडपसर गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळत धिंड काढली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, हडपसर भागात काही दिवसांपूर्वीच कोयता गँगने धुडगूस घातल्याचे समोर आले होते. आरोपींकडून हडपसर भागात ७ ते ८ गाड्यांची तसेच परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली होती

. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत करणाऱ्या चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी या गुन्हेगारांना अटक करत ज्या परिसरात त्यांनी गाड्यांची तोडफोड केली होती. त्याच परिसरात त्यांची धिंड काढली. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

राज्यातील लाखो नागरिकांची लोन अॕपच्या माधमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अॕप टोळीची आता इडीकडून चौकशी होणार आहे.

गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी लोन ॲपच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बेंगलोर येथील कॉल सेंटर उध्वस्त करत टोळीला जेरबंद केले होते. या लोन ॲप टोळीने विदेशात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याची संशय इडीला आहे.

त्यामुळेच या प्रकरणाची ईडी चौकशी होणार आहे. पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे.

Latest News