विहार सेवा ग्रुपचे प्रणेते महाबोधीसुरिश्वरजी महाराज यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन


विहार सेवा ग्रुपचे प्रणेते,प्रवचन शिखर प.पु.आ.दे.श्री.वि.महाबोधीसुरिश्वरजी महाराजा आदी ठाणा 3 चे पिंपरी चिंचवड मध्ये आगमन झाले.. श्री मुनिसुव्रतस्वामी जैन श्वेतांबर संघ,निगडी द्वारा आचार्यश्री चे भव्य स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी निगडी संघ तसेच जैन सकल समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. निगडी,चिंचवड स्टेशन, एम्पायर इस्टेट,पिंपरी, दापोडी आदी संघानी आचार्यश्रीचे भव्य स्वागत केले.
देहूरोड ते बोपोडी ह्या विहार यात्रेचे नियोजन व सेवेचा लाभ विहार सेवा ग्रुप पिसीएमसी ने घेतलाआचार्यश्रींच्या प्रेरणेने जैन साधु संताच्या विहार यात्रेत महात्म्यांना सुरक्षित रित्या गंतव्य स्थळी पोहोचवण्यासाठी संपूर्ण भारतात 500 हुन अधिक विहार सेवा ग्रुपच्या माध्यमातून हजारो विहार सेवक सेवा देतात…अशी माहिती पिंपरी चिंचवड जैन विहार सेवा ग्रुप चे प्रमुख यांनी दिली