राष्ट्रवादीच्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड ‘रोल मॉडेल’- युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची भावना-


:* राष्ट्रवादीच्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड ‘रोल मॉडेल’- युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांची भावना-
शहर युवक कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र वाटप समारंभ उत्साहात
पिंपरी | प्रतिनिधीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांमुळे पिंपरी-चिंचवड विकासाचे ‘रोल मॉडेल’ झाले आहे. अजित पवार यांचे या शहरावर विशेष प्रेम असून, त्याला साजेसे युवक संघटन उभे राहील, असा विश्वास युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्या पुढाकाराने शहर कार्यकारिणीचा पद नियुक्तीपत्र वाटप आयोजित युवक मेळाव्यामध्ये करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, राजेंद्र जगताप, संगीता ताम्हाणे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, सरचिटणीस विशाल काळभोर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, शाम जगताप, ॲड. गौरव लोखंडे,पक्ष प्रवक्ते विनायक रणसुभे, खजिनदार दीपक साकोरे, महिला वरीष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, मनीषा गटकळ, विजया काटे, संगीता कोकणे, माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, शोभा पगारे, युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रसेच्या चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतिक साळुंखे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अक्षय माछरे, भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, मुख्य संघटक प्रशांत सपकाळ, प्रवक्ते भागवत जवळकर, चेतन फेंगसे यांच्यासह एकूण ७५ जणांची जंबो कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे आज इंदू लॉन्स, काळेवाडी येथे पदवाटप करण्यात आले.शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, तरुणांचा देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे
. त्यामुळे देशाला उज्वल भविष्य आहे. तरुणांच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. मिळालेल्या पदाचा उपयोग समाजासाठी करावा, असे आवाहनही गव्हाणे यांनी केले.सूत्रसंचालन दिपक साकोरे यांनी केले
. प्रस्तावना शहराध्यक्ष शेखर काटे यांनी केली.******अजित पवारांनी निर्णय घेतला; तर चुकलं काय? : सुरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळी टीका केली होती.
त्यांनीही आपले नेतृत्वावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तरीही राज्याच्या विकासाचा विचार करून आपण “कॉमन मिनिमम प्रोग्राम” तयार केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना सोबत आपण सत्तेत बसलो.
शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला. आपण त्यांच्या पाठीशी राहिलो. ज्यावेळी अजितदादांनी निर्णय घेतला. त्यावेळी तुम्ही म्हणणार विचार सोडला. ही भावना म्हणजे “आमचं ते प्रेम आणि तुमचं ते लफडं…” अशी आहे, अशी घणाघाती टीका सुरज चव्हाण यांनी केली
:पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद सारखा उपक्रम हाती घेण्यात आला असून, शहराच्या चारही कोपऱ्यामध्ये युवकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली विकास कामे आणि राष्ट्रवादीचे महत्त्वकांक्षी निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांची तगडी फळी निर्माण करण्याचा आमचा निर्धार आहे.- शेखर काटे, शहाराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड.