रामचंद्र पोतदार लिखित मुकद्दर का सिकंदर पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन…

पिंपरी, पुणे ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- (दि.६ फेब्रुवारी २०२४) निवृत्त शिक्षक रामचंद्र दत्तात्रय पोतदार लिखित मुकद्दर का सिकंदर या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि.८) निगडी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ओम शांती सेंटर, म्हाळसाकांत चौक जवळ येथे होणार आहे.
प्रणाली प्रकाशन ने प्रकाशित या केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती पारितोषिक विजेते हभप किसन महाराज चौधरी यांच्या हस्ते होणार असून ब्रह्मकुमारी सेंटरच्या उर्मिला दीदी आणि संगीता दीदी, चित्रकार धीरज आणि विजय दीक्षित आदी उपस्थित राहणार आहेत. शरीराचा आणि प्रकृतीचा धर्म कर्म करणे आहे. वाईट कर्मापासून दूर राहण्याचा मार्ग आणि प्राचीन राजयोग या पुस्तकातून सहज सोप्या पद्धतीने वाचकांना समजून घेता येईल. या प्रकाशन समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लेखक रामचंद्र पोतदार यांनी केले आहे.

Latest News