पवार साहेब माझ्याबद्दल असे बोलतील असे मला अपेक्षितच नव्हते- आमदार सुनील शेळके

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वाईट वाटते आहे. साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांना ही खोटी माहिती देण्यात आली. मी कोणत्याही कार्यकर्त्याला दमदाटी केलेली नाही. साहेब माझ्याबद्दल असे बोलतील असे मला अपेक्षितच नव्हते, अशी भूमिका मांडताना माझ्यावरील आरोप सिद्ध करा नाहीतर मी महाराष्ट्रात जाऊन सांगेन की शरद पवार यांनी माझ्यावर खोटे आरोप केले असे मत राष्ट्रवादी चे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले

,यावर तातडीने सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त करत शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याने माझ्यावर अशी टीका करणे हे अपेक्षित नव्हतं, असे सांगत ज्यांनी खोटी माहिती दिली त्या बद्दल मी साहेबांना भेटून विचारणार असल्याचे शेळके यांनी सांगितले आहे.

यावेळी सुनील शेळके म्हणाले की, “मी अजित पवार यांच्या सोबत गेलो कारण अजित पवार यांनी मला निधी दिला, माझ्या मागे उभे राहिले, त्यामुळे मी त्यांच्यासोबत का जाऊ नये?” असा प्रश्न शेळके यांनी उपस्थित केला.

तसेच “पुढील आठ दिवसात मी दम दिलेला एकतरी व्यक्ती त्यांनी समोर आणावा, पुरावे द्यावेत, नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केले असे मी राज्यभर सांगणार”,

 

असे आव्हान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिले.लोणावळा येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनील शेळके यांच्या कथित दमदाटीवर बोलताना त्यांच्यावर जोरदार टीका केली.

Latest News