पुणेकरांना सुविधा देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध ”, -उपमुख्यमंत्री अजित पवार 

पुणे (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )

राज्यातील विकास कामांचे प्रकल्प पूर्ण करणार आहोत. पुण्यात ११७५ कोटी रुपयांचे आज भूमिपूजन झालं आहे. दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण काम झालं पाहिजे. पुणेकरांना सुविधा देण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

“विरोधकांना आता मुद्दा राहिलेला नाही. ते म्हणतात सगळं गुजरातमध्ये चाललंय. जे महाराष्ट्राचं आहे ते महाराष्ट्राचंच राहणार. काही राज्यकर्ते चुकीचे निर्णय घेतात, विद्यापीठ पूल काढावा लागला. तुमची सहनशीलता संपलेली आहे. विक्रम कुमार काम जोरात करा. आम्ही मंत्रालयात बसून सगळे प्रश्न मार्गी लावायचे काम करतो.

सगळे आमदार या गोष्टींचा पाठपुरावा करत आहेत.

पुण्यात कोयता गँगची दहशत बघायला मिळते. कोयता गँगकडून प्रचंड तोडफोड केली जाते. तसेच अनेकांवर हल्लेही केले जातात. त्यामुळे पुण्यात वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. पण यांनी पुणेकरांना कोयता गँगचा सुफडा साफ करणार, असं आश्वासन दिलं आहे.

“कायदा-सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. “कोयता गँगचा सुफडा साफ करणार”, असंही आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. “कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं कितीही मोठ्या बापाचं असलं तरी सुद्धा आता काही चालणार नाही. काही लोकं म्हणतात की आत्ता चूक झाली पदरात घ्या!

Latest News