महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाचे ९७७ काेटींचे उत्पन्न


महापालिकेच्या इतिहासात प्रथमच कर संकलन विभागाचे ९७७ काेटींचे उत्पन्न
पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 1 हजार कोटींच्या जवळपास टप्पा गाठला आहे. त्यामुळे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे हा कर संकलन विभागाचा एक माईलस्टोन ठरला आहे. 6 लाख 25 हजार मालमत्ता धारकांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.
यंदा आम्ही प्रथमच मालमत्ता कर आणि पाणी पट्टी वसुली एकात्मिक पद्धतीने वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी दोन्हींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. कर भरणा-या प्रामाणिक करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.

सन 2024-25 या वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. तसेच सर्व मालमत्तांच्या युपिक आयडी द्वारे महापालिकेच्या सर्व सेवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे
.गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया, मीम्स, रिल्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मिडीयाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पिकरवर थकबाकीदारांच्या नावांची घाेषणा करणे, जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात केली.
याचे फलित म्हणूनच एक हजार काेटींच्या जवळपास कर वसुल झाला आहे. # महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 977 काेटींची मजल# दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.# विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाईन.#पहिल्यांदाच 87 टक्के चालू कर वसूल करण्यात यश# 49.36 टक्के थकीत कर वसूल करण्यात यश आले
रूपया..ऑनलाईन – 554 कोटी 59 लाख रोख. – 137 कोटी 49 लाख धनादेशाद्वारे – 166 काेटी 57 लाखईडीसी – 13 काेटी 81 लाख आरटीजीएस -44 कोटी 76 लाख डीडी – 8 काेटी 57 लाख विविध ॲप – 10 कोटी 2 लाखइनइफ्टी – 6 काेटी 93 लाख औद्योगिक – 4 हजार 609निवासी- 4 लाख 42, 285बिगरनिवासी – 46 हजार 576मिश्र- 12 हजार 968 मोकळ्या जमिन 4 हजार 574 इतर – 142एकूण 5 लाख 11 हजार 154वाकड झोनमधून 154 काेटींचा उच्चांकी कर वसूल..शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 68 हजार मालमत्ता धारकांनी 154 काेटी 58 लाख रुपयांचा कर जमा केला आहे.
त्याखालोखाल सांगवीत 51 हजार 718, चिखलीत 45 हजार 634, थेरगावमध्ये 45 हजार 434, चिंचवडमध्ये 43 हजार 286, माेशीत 34 हजार 980, भाेसरीत 33 हजार 867 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 527 मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे
. कर वसुलीचा वाढता आलेख..वर्ष वसुल झालेल्या कराची वाढता आलेख 2018-19 : 471 कोटी2019-20 : 480 कोटी 2020-21 : 553 कोटी2021-22 : 628 कोटी2022-23 : 816 कोटी2023-24 : 977 काेटी यंदा आम्ही एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोचलो याचे समाधान आहे
तसेच मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेली जप्ती मोहीम आणि यंदा जप्ती केलेल्या मालमत्तांची प्रथमच राबवलेली लिलाव प्रक्रिया याचाही कर संकलनाला उपयोग झाला आहे. यापुढेही जप्ती आणि लिलाव प्रक्रिया वर्षभर निरंतर स्वरूपात राबवण्यात येईल. नागरिकांनी त्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. यंदा आम्ही इतर शासकीय विभाग जसे की IGR, महावितरण यांच्या डेटाबेेसबरोबर एकात्मिकरण करणार आहोत. त्यामुळे सेवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल.