रेड झोनचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय किवळे-रावेतच्या रहिवाशांना दिलासा देणारा – बारणे

रावेत, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या भोवतीचे प्रतिबंधित क्षेत्र अर्थात रेड झोन कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्रातील मोदी सरकारने किवळे, रावेत भागातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे, असे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) सांगितले.

खासदार बारणे यांनी आज रावेत परिसरातील काही लोकप्रतिनिधी व मान्यवरांची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. नामवंत उद्योजक नंदकुमार भोंडवे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.‌ त्यावेळी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख नीलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, देहूगाव शहर प्रमुख सुनील हागवणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार तसेच प्रकाश भोंडवे, दिवाणजी भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, सोमनाथ भोंडवे, राम भोंडवे, सुनील भोंडवे, दीपक भोंडवे, शांताराम भोंडवे, अतुल भोंडवे, सुनील मोरे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, रेड झोनचा प्रश्न बराच गुंतागुंतीचा होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने रेड झोनचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रावेत, किवळे भागातील रेड झोन बाधित रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मेट्रोच्या पुढच्या टप्प्यात निगडी भक्ती-शक्ती चौकापासून किवळ्यातील मुकाई चौक, रावेत मार्गे वाकडपर्यंत मार्ग विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पामुळे या परिसरातील विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

खासदार म्हणून आपण गेल्या दहा वर्षात केलेले कार्य आणि सर्वसामान्य मतदारांशी सातत्याने ठेवलेला संपर्क यामुळे आपण या निवडणुकीत तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होऊ, असा आत्मविश्वास आहे, असे ते म्हणाले. मतदार संघातील 25 लाख मतदार हे माझे नातेवाईक आहेत त्यांच्याशी आपली नाळ जोडली गेली आहे, असे बारणे यांनी सांगितले.

नंदकुमार भोंडवे व शांताराम भोंडवे यांचेही यांचेही यावेळी भाषण झाले. रावेत ग्रामस्थांच्या वतीने फटाके वाजवून व सत्कार करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, दत्तात्रय भोंडवे, शांताराम भोंडवे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, विजय भोंडवे, साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी भोंडवे आदींच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.

Latest News