सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक सामाईक परीक्षेची घोषणा…

(पुणे ऑनलाईन न्युज परिवर्तनाचा सामना-

विद्यापीठाच्या विभागांमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जातात. यासाठी दरवर्षी 100 गुणांची ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते. पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासह नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमांचाही या प्रवेश परीक्षेत सहभाग आहे.विद्यापिठाने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.यामध्ये पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश परिक्षा मुदत 13 जून पर्यंत असणार आहे. तसेच पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा  ही 14 ते 16 जून पर्यंत असणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये ( Pune) प्रवेशासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.

प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, 10 मे पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.पारंपारिक अभ्यासक्रमांसह व्होकेशनल, तांत्रिक, व्यवस्थापन, ललित कला, उपयोजित विज्ञानातील अनेक अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओळखले जाणारे विद्यापीठ आता पदवी अभ्यास क्रमांबरोबरच सर्वसमावेशक पदवीचे केंद्र बनत आहे. त्यामुळे इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही विद्यापीठातील काही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविता येणार आहे. प्रवेशाबाबात अधीक माहितीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापिठाच्या https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspxया संकेतस्थळावर भेट देता येणार आहे.

Latest News