पुणे पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पुणे जिल्हयातील मुठा गावात पुणे पोलीस आणि गुन्हेगारात गोळीबाराचा थरार रंगला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कुख्यात गुंड नव्या ऊर्फ नवनाथ वाडकर याला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की, नव्या ऊर्फ नवनाथ वाडकर हा पुण्यातील सराईत गुन्हेगार आहे. पुणे जिल्हयातील मुठा गावात गुंड नव्या वाडकर याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर  वाडकर याने गोळी झाडली.

त्यानंतर पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल वाडकर याच्या दिशेने गोळ्या (Pune) झाडल्या परंतु  एकही गोळी गुंड वाडकर याला लागली नाही. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाडकर याला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.

Latest News