PCMC: मावळमधील श्रीरंग बारणें 96,615 मतांचं मताधिक्य घेऊन विजय  

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणेंना 6 व्या मतदान फेरीत 39 हजार 891मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे, मावळमध्ये शिंदेचा जोर असल्याचे दिसून आले. आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत मावळमधील श्रीरंग बारणेंचा विजय निश्चित झाला असून बारणेंनी 96,615 मतांचं मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग पाटील यांना 5 लाख 96 हजार 217 मतं मिळाली आहेत.गत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार यांच्यात थेट लढत झाली होती. शिवसेना पक्षाला कायम साथ देणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. त्यामुळे, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारास नाकारुन येथील जनतेने शिवसेनेच्य बाजुने कौल दिला. मात्र, यंदा प्रथमच येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. पण, नेमकं कोणत्या शिवेसनेच्य बाजुने येथील जनता कौल देणार हे स्पष्ट होत आहे. मावळ मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी भाजपचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे. मात्र, शिवसेनेच्या मतांची दोन गटांत विभागणी झाल्याने बारणे यांची भिस्त यंदा भाजप, राष्ट्रवादीवर होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने येथे हवा तेवढा प्रचार केला नाही, किंवा तसा जोर लावला नाही, असा आक्षेप शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून घेण्यात आला आहे.  तर, संजोग वाघेरे ऐन निवडणूक प्रचार कालावधीत अजित पवारांच्या पाया पडले होते, त्यामुळेही बारणेंच्या समर्थकांत वेगळीच चर्चा रंगली होती. जिल्ह्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणून मतदारसंघाकडे पाहिले जाते. मावळ लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघोरे यांच्यात थेट लढत होत आहे.  पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या तसेच दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा 54.87 टक्के मतदान झाले. त्यामुळे, घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार, विद्यमान खासदारांना अवघड जाणार की, ठाकरेंच्या उमेदवाराला लाभ होणार हे पुढील काही तासांतच स्पष्ट होईल. महायुतीचे उमेदवार खासदारश्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह 33 उमेदवार येथील निवडणूक रिंगणात होते. मात्र, बारणे विरुद्ध ठाकरे अशीच लढत या मतदारसंघात झाल्याचं दिसून येतं.  त्यामुळे, मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणेंच्या विजयाची हॅटट्रीक झाली असून 96 हजारांचं मताधिक्य घेऊन ते मावळमधून तिसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार बनले आहेत

उमेदवाराचे नावपक्षमिळालेली मतं
श्रीरंग बारणे शिवसेना (एकनाथ शिंदे) 
संजोग वाघेरेशिवसेना (उद्धव ठाकरे) 
   

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांचा पराभव करुन दोनवेळा सहजपणे दिल्ली गाठणाऱ्या बारणे यांच्या समोर तिसऱ्या वेळी शिवसेना उमेदवाराचे आव्हान असल्याने ही लढत अटीतटीची ठरली. मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे कर्जतचे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे, बारणे यांची भिस्त भाजप, राष्ट्रवादीवरच होती. पनवेलला प्रशांत ठाकूर, चिंचवडला अश्विनी जगताप या भाजपच्या आमदार असून, उरणचे महेश बालदी हे भाजपशी संलग्नीत आहे. मावळला सुनील शेळके आणि पिंपरीत अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत.

विधानसभा – मतदान

पनवेल – 50.04 टक्के

कर्जत – 61.39

उरण – 67.07

मावळ – 55.42

चिंचवड – 52.19

पिंपरी – 50.55

Latest News