*युवा नेते विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन*


पिंपरी-चिंचवड, – सामाजिक बांधिलकी जपत आणि जनसंपर्क वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने युवा नेते विशाल भाऊ वाकडकर (प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे आयोजन अजय कांबळे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
त्याच दिवशी दुपारी २ वाजता वाकड येथे बांधकाम कामगारांसाठी शिधा वाटपाचा उपक्रम राबवला जाणार आहे.विशाल भाऊ वाकडकर यांच्या वाढदिवसाच्या मुख्य दिवशी, ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता वाकड येथील वाकडकर वस्ती येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले
यामध्ये मोफत चष्मे वाटप तसेच आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. त्याच दिवशी दुपारी १२ वाजता काळाखडक वाकड येथील मज्जिद येथे मुस्लिम बांधवांना फळे वाटप करण्यात येणार आहे
.याच दिवशी दुपारी २ वाजता वाय. सी. एम. रुग्णालय, पिंपरी येथे रुग्णांना फळे वाटपाचा उपक्रम राबवला जाणार आहे.
त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता यमुनानगर, निगडी येथे श्री प्रसाद कोलते यांच्या माध्यमातून अपंग पुनर्वसन केंद्रातील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटप करण्यात येणार आहे
.४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता मातृछाया अनाथाश्रम, दिघी येथे अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम मंगेश असवले आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता काकडे पार्क, चिंचवड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ६ एप्रिल २०२५ रोजी भोलेश्वर मंदिर, चिंचवडे नगर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचे आयोजन अमोल पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे
.या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.