प्रारूप विकास आराखड्याविरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून गुरूवारी एल्गार मोर्चा !

ps logo rgb

पिंपरी: (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) पिंपरी चिंचवड शहराचा पारूप विकास आराखडा हा शहरातील काही सस्था, पालिकेचे अधिकारी, सत्ताधारी पक्षातील काही लोकांनी आराखडा तयार केला असूनतो सर्व सामाण्य दलित कष्टकरी, कामगार विरोधी असल्याने शासनाने हा आराखडा तात्काळ रद्द करा या साठी गुरुवारी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याला दिशा देणारा प्रारूप सुधारित विकास आराखडा २०२५ हा केवळ कागदावरचा देखावा असून तो शहरातील जनतेच्या भावना, कायदेशीर बाबी आणि विकासाच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे तब्बल ५०,००० नागरिकांनी हरकती घेतल्या ही त्याची पावती आहे. भूमिपुत्र, शेतकरी, छोटे कारखानदार, गोरगरिब सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यास हा आराखरा सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे.या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने गुरुवार, दि. ७ऑगस्ट २०२५ रोजी महापालिका भवनावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांना बगल देत, हा आराखडा केवळ जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे. हा प्रारूप आराखडा केवळ बेकायदेशीरच नाही, तर पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक अव्यवहार्यता आणि समन्वयाच्या अभावाचे उत्तम उदाहरण आहे.जुन्या आराखड्यातील ८०० हून अधिक आरक्षणे (एकूण १,४३० पैकी ५६%) कोणतीही फेरबदल न करता तशीच ठेवण्यात आली आहेत. विशेषतः, फक्त २०.८% आरक्षित जागांचा विकास झाला असून, १,१०० हून अधिक जागा अविकसित राहिल्या किंवा त्यावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत.
यामुळे आराखड्याची व्यवहार्यता धोक्यात आली असून, सार्वजनिक सुविधा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. कालबाह्य आरक्षणांमुळे कायदेशीर वाद आणि महापालिकेचा आर्थिक भारसुध्दा वाढला आहे.’भीमसृष्टी मैदान’ वरील धक्कादायक आरक्षणेः

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील ऐतिहासिक ‘भीमसृष्टी मैदान’वर पोलीस स्टेशन, मनपा उपयोग आणि बस टर्मिनसचे आरक्षण प्रस्तावित करणे हा आंबेडकरी अनुयायी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांवर केलेला क्रूर हल्ला आहे. हे मैदान आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे,

जिथे हजारो नागरिक डॉ. आंबेडकर जयंतीसह वर्षभरात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकत्र येतात. या मैदानाचे महत्त्व दुर्लक्षित करून, त्यावर आरक्षण टाकणे निषेधार्ह आहे. तसेच चिंचवड गावातील ऐतिहासिक चाफेकर स्मारकासाठी असलेल्या आरक्षणावर इतर आरक्षणे टाकले आहे. अशा चुकीच्या आरक्षणामुळे नागरिकांच्या भावनांचा व समाजाचा खेळ झाला आहे.

रेडझोन आणि पूररेषेत आरक्षणे –

देहू दारूगोळा कोठाराच्या २००० यार्ड प्रतिबंधित क्षेत्रात, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या निळ्या आणि लाल पूररेषांमधील नाविकास क्षेत्रात तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या १०० मीटर वफर झोनमध्ये बांधकामाला प्रतिबंध असतानाही, येथे शाळा, रुग्णालये, हॉकर्स झोन यांसारखी बांधकामयोग्य आरक्षणे प्रस्तावित केली आहेत.

Latest News