पिंपरी चिंचवड,;अभय योजना’ १ मार्चपासून सुरू; महापालिका करावरील बिलंब दंडावर मिळणार तब्बल ९० टक्के सवलत.: महापौर रवी लांडगे

पिंपरी (ऑनलाईन न्यूज परिवर्तनाचा सामना )
शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारी ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने या करावरील बिलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत मिळणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केले आहे. महापौर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महापौर रवी लांडगे यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शैलजा बाबर, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल हे उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी मालमत्ताकर हा महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा नागरिकांच्या मालमत्ता करातूनच उभ्या राहत आहेत. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना असून, नागरिकांच्या करातूनच शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सेवा व इतर विकासकामे उभी राहत असतात.
आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रतिसाद देत सुमारे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्र, सोशल मिडीया व विविध माध्यमातुन मालमत्ता कर भरण्याचे नागरिकांना आवाहन करणेत येत आहे
.तसेच, शहरातील एकूण सुमारे २ लाख १२ हजार ४४० थकबाकीदारांनी अद्यापही थकीत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही. या थकबाकीदारांनी विलंब न करता त्वरित संपूर्ण रकमेचा भरणा करावा असे आवाहन महापालिका प्रशासनामार्फत वेळोवेळी केले जाते
