महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या ५व्या वार्षिक परिषदेचे भव्य आयोजन…


पुणे, (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) दि. ७ ऑगस्ट : महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनतर्फे *पाचव्या वार्षिक परिषदेचे भव्य आयोजन शनिवार, ९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृह, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे होणार आहे. २०१५ पासून कार्यरत असलेल्या या असोसिएशनचे १७,००० नोटरी सभासद आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सय्यद अली सिकंदर, जे महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य सचिव देखील आहेत, यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडेल. कार्याध्यक्ष ऍड. यशवंतराव खराडे, सचिव ऍड. प्रवीण नलावडे, कोषाध्यक्ष ऍड. ऐस. जी. ऐच. काद्री, पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ऍड. अतिश लांडगे, महिला अध्यक्ष ऍड. शोभा कड, प्रवक्ते ऍड. समीत चिंतामण राऊत आणि ऍड. अस्मा शेख आणि इतर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन या परिषदेला लाभेल.
कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
- उद्घाटन: केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री मा. श्री. अर्जुन राम मेघवाल, सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. प्रसन्ना बी. वराले, मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती श्री. आलोक अराधे, मा. पालक न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते डेरे, मा. न्यायमूर्ती श्री. संदीप मारणे, मा. न्यायमूर्ती श्री. आरिफ एस. डॉक्टर आणि मा. प्राचार्य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. महेंद्र महाजन यांच्या शुभहस्ते होणार आहे.
- महाराष्ट्र उत्कृष्ट विधी तज्ञ पुरस्कार: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या हस्ते विधी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान.
- चर्चासत्रे: विधी क्षेत्रातील समकालीन आव्हाने आणि संधींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
या परिषदेत विधी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि प्रगतीवर चर्चा होईल. असोसिएशनने नवनिर्वाचित नोटरी वकिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये असोसिएशनने प्रस्तावित नोटरी (दुरुस्ती) विधेयक, २०२१ मागे घेण्यासाठी केंद्र सरकारवर यशस्वी दबाव आणला, ज्यामुळे १५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या नोटरींच्या परवान्याच्या नूतनीकरणावर प्रस्तावित बंदी हटवली गेली. ही उपलब्धी देशभरातील नोटरींच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
सर्व सभासद, विधी तज्ञ आणि मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
बातमीदाता: ऍड. समीत चिंतामण राऊत, प्रवक्ते, महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन