PCMC महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या निकृष्ठ बीसी पावडर खरेदीची चौकशी करा : सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी….


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महापालिका आरोग्य विभागाचा आणखी एक ” प्रताप ” उघड जंतूनाशक बीसी पावडर निकृष्ट असल्याचा आरोप पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महानगरापलिका आरोग्य विभागाने घेतलेली बीसी पावडर ही नागरिकांच्या जीवितास धोकादायक असून या बीसी पावडरची चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकार यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.मागणी पत्रामध्ये मारुती भापकर यांनी सांगितले आहे
की ” शहरातील नागरवस्ती भागात असणारे उंबर, पिंपळ, वड, बाभूळ यासारख्या झाडावर अस्वल किडे निर्माण होतात आणि हे किडे त्या झाडाजवळून गेल्यावर लहान मुले, महिला व नागरिकांच्या अंगावर पडतात त्यामुळे अंग लाल होणे, अंगावर पुळ्या उठणे, खाज सुटणे असे संसर्ग होतात. यावर उपाय म्हणून महापालिका दरवर्षी झाडांच्या बुंध्यावर, परिसरात बीसी पावडर टाकते त्यामुळे अस्वल किड्यांचा बंदोबस्त होतो. मागील वर्षापर्यंत बीसी पावडर टाकल्याने नागरिकांना अस्वल किड्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य त्रासापासून सुटका होत होती
मात्र यावर्षी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहन नगर, फुलेनगर परिसरातील झाडांना व परिसरात बीसी पावडर टाकली मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अनेक नागरिकांना अस्वल किड्यांचा त्रास सुरु आहे. महापालिका आरोग्य विभागाने वापरलेली बीसी पावडरचा कसलाच वास ही येत नाही ही पावडर निकृष्ट दर्जाची असल्याचे सिद्ध झाले असल्याचे भापकर यांनी सांगितले
.मारुती भापकर पुढे म्हणाले की ” शहरातील नागरिकांच्या थेट आरोग्याशी संबंधित असणाऱ्या याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे मी लेखी पत्र दिले असून याची चौकशी होणे गरजेचे आहे.जशी मागणी तशा पुरवठा…याप्रकारणी महापालिका भांडार विभागाशी आमच्या प्रतिनिधिने संपर्क साधला असता आरोग्य विभागाने आमच्या विभागाकडे ज्या प्रकाराच्या पावडरची मागणी केली त्या प्रमाणे आम्ही पुरवठा केला असून याबाबत संबंधित विभागच अधिक माहिती देऊ शकेल असे भांडार विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाची बीसी पावडर खरेदीची जबाबदारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विभागाकडून नागरी जीवनाला धोकादायक जीव जंतुनाशक बीसी पावडरचा वापर केला जातो.
दरवर्षी नागरी वस्तीमध्ये उंबर, पिंपळ,वड, बाभूळ झाडे असणाऱ्या भागात अस्वल किडे निर्माण होतात. हे अस्वल किडे खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन ते लहान मुले,महिला व नागरिक यांच्या अंगावर पडतात. या संसर्गामुळे अंग लाल होणे, त्या ठिकाणी खाज येणे, अंगावर पुळ्या उठणे हे प्रकार होतात.
गतवर्षी पावसाळ्यात मोहननगर,महात्मा फुलेनगर परिसरात हा गंभीर प्रकार झाला होता.त्यावेळी औषध फवारणी करण्यात आली होती. मात्र तरीही या अस्वल किड्यांचा प्रतिबंध होत नव्हता. त्यावेळी आपल्याशी मी थेट बोललो होतो. त्यानंतर आरोग्य विभागाने महात्मा फुलेनगर व मोहन नगरच्या या झाडांच्या ठिकाणी व घरांवर बीसी पावडर मारली होती. गेल्या वर्षी या पावडरचा रिझल्ट चांगला होता.
यावर्षी देखील महात्मा फुले नगर व मोहननगर विभागात या अस्वल किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मागील काही महिन्यांमध्ये तीन-चार वेळा ही बीसी पावडर मारली. मात्र या पावडचा वास बिल्कुल येत नसून या पावडरमुळे या अस्वल किडीला प्रतिबंध होत नाही. त्यामुळे माझ्यासह या विभागातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे ही बीसी पावडर निकृष्ट दर्जाची असण्याची शक्यता आहे. आपण कृपया या गंभीर प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांनी केली आहे