गणेशोत्सव काळातील ”पुणेमेट्रोचे” विशेष वेळापत्रक जाहीर…


पुणे | (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्योत्सव’ म्हणून मान्यता दिल्यानंतर पुणे मेट्रोकडून भाविकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.२७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट (पहिले तीन दिवस) : नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सेवा ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर : मेट्रोची सेवा मध्यरात्री 2 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे, जेणेकरून भाविकांना रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शनाचा आणि देखावे पहाता येणार आहेत.अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) : या दिवशी मेट्रो सेवा 41 तास अखंड सुरू राहणार आहे. म्हणजेच, 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6 पासून ते 7 सप्टेंबर रोजी रात्री 11 पर्यंत मेट्रो धावत राहील. यामुळे विसर्जन मिरवणुकीसाठी येणार्या भाविकांना मोठा फायदा होईल.पुणेकरांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक सोयीस्कर ठरणार आहे. यंदा गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोची सेवा वाढविण्यात आली असून, यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि लाखो भाविक या काळात दर्शनासाठी पुण्यात दाखल होतात. यावर्षीच सुरु झालेला ‘जिल्हा न्यायालय–स्वारगेट’ भूमिगत मार्ग हा प्रवासासाठी नवा पर्याय ठरणार आहे.