गेनबा सोपानराव मोझे, येरवडा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

1004807124

गेनबा सोपानराव मोझे, येरवडा शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

वसुधा फाउंडेशन तर्फे गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, येरवडा, पुणे- 06या शाळेत ‘रमाची पाटी ‘हा लघु चित्रपट दाखवला. तसेच ‘शैक्षणिक साहित्याचे’ व ‘खाऊचे’ वाटप केले.

मा. मुख्याध्यापक श्री. भागवत सर व सौ. उज्वला यादव मॅडम यांच्यामुळे शाळा उपलब्ध झाली. उज्वला मॅडमने प्रथम मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांना परिचय करून दिला. वसुधा फाउंडेशन द्वारे होणारे सामाजिक कार्य सांगितले. आत्तापर्यंत किती पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्याची थोडक्यात माहिती दिली.

सौ. वसुधा नाईक यांनी बालगीतांनी सुरुवात केली. बालगीतामध्ये मुले छान रमली होते. काव्ययोग संस्थेचा संस्थापक योगेश हरणे यांनी मुलांचा खेळ घेतला. नंतर ‘रमाची पाटी’ हा लघुपट दाखवण्यात आला. लघुपट पाहण्यात मुले छान रममाण झालेली होती.

मुलांनी लघुपटाचा आनंद घेतला. लघुपटातून आपण कोणता बोध घेतला या प्रश्नाची उत्तरे खूप छान मिळाली. मुले चुणचुणीत व हुशार आहेत. नंतर मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप सौ. वसुधा नाईक व सौ. वैशाली बांगर,योगेश हरणे यांच्या हस्ते करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.

त्यांच्या ह्या आनंदात आमची टीम खूप सहभागी होती. मुलांना गाणी घेतली की मुले छान आपल्याशी संवाद साधतात. खूष असतात. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.यादव सर, शिक्षिका उज्वला यादव मॅडम, व शाळेचा सर्व स्टाफ,योगेश हरणे, युवा क्रांती पदाधिकारी सौ.वैशाली बांगर या सर्वांचे मनःपूर्वक आभार. शाळेतील वरिष्ठांना ‘ रमाची पाटीचा फोटो ‘ व ‘आईचे हळवे मन ‘हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रम खूप उत्कृष्ट झाला. कोणताही कार्यक्रमाला सर्वांची साथ असेल तर कार्यक्रम उत्तमच होतो.