PSI परीक्षेत 2023 मध्ये मुलींमध्ये राज्यातून अव्वल ठरलेली अश्विनी केदारी चा दुर्दैवी अंत


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
२अश्विनी केदारींच्या जाण्याने एका उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या मुलीचे आयुष्य अकस्मात थांबले आहे.पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून आलेली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत 2023 मध्ये मुलींमध्ये राज्यातून अव्वल ठरलेली अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. गेल्या ११ दिवसांपासून मृत्यूशी लढा देत असताना अखेर तिच्या जीवाची बाजी हरली गेली. या बातमीने खेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे
2८ ऑगस्ट रोजी अश्विनीसोबत अतिशय भीषण प्रसंग घडला. सकाळी अभ्यासानंतर अंघोळीसाठी पाणी तापवायला ठेवले असताना, पाणी किती गरम झाले आहे हे पाहण्यासाठी ती बाथरूममध्ये गेली. त्याचवेळी हीटरचा मोठा शॉक बसला आणि उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. या अपघातात ती तब्बल ८० टक्के भाजली होती. तातडीने तिला पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण अकरा दिवसांच्या उपचारानंतर अखेर तिचा मृत्यू झाला.
अश्विनी केदारी या पुण्यातील खेड तालुक्यातील पाळू गावच्या शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन पुढे आल्या होत्या. कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये अव्वल येण्याचा मान मिळवला होता.
एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून मुलगी राज्यात अव्वल येते, हे गावकऱ्यांसाठी अभिमानाचे कारण ठरले होते.करिअरच्या उंबरठ्यावर असताना आलेला हा मृत्यू सर्वांसाठी हादरवणारा आहे. गावातील ग्रामस्थ, शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवार या दु:खद प्रसंगाने हळहळ व्यक्त करत आहेत.
.