GST: महागाई वर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश हे अपयश झाकण्याचा प्रयत्न- अमोल कोल्हे


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
एक वडील आपल्या मुलाला चार वेळा रागवायचे आता ते दोनदाच रागावतात, आणि मुलाला सांगतात बघ मी तुझ्यावर किती प्रेम करतो, त्याचा उत्सव साजरा कर. महागाई वर नियंत्रण आणण्यात सरकारला अपयश आलं आहे. हे अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकार यातून करत आहे. मात्र यामुळे नागरिकांना सवलत मिळणार असल्यानं नव्या बदलाचे स्वागत केले पाहिजे, सरकारचं अभिनदंन केलं पाहिजे. मात्र यामध्ये वन नेशन, वन टॅक्स होणं गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.दरम्यान तीन तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असताना, हे सगळं समोर असताना उत्सव कसा साजरा करायचा? अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाच्या संबंधांबाबत आपल्याला मोठं अपयश आलेलं आहे. अमेरिकेकडून व्हिसावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे आयटी क्षेत्र धोक्यात आहे. मग उत्सव कसा सजरा करायचा असा प्रश्न यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहेआज मध्यरात्रीपासून देशात जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, पूर्वी जीएसटीचे चार स्लॅब होते 28 टक्के, 18 टक्के, 12 टक्के आणि 5 टक्के त्यातील दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. जीएसटीचे 28 टक्के आणि 12 टक्के असे दोन स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. आता केवळ 18 टक्के आणि 5 टक्के हे दोनच स्लॅब लागू असणार आहे, यामुळे अनेक वस्तूंचे दर आता स्वस्त होणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.
“देर आये कुछ दुरुस्त आये” असा खोचक टोला यावरून अमोल कोल्हे यांनी भाजपला लगावला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘वन नेशन वन टॅक्स अशी GST ची संकल्पना होती, त्यामुळे हे स्लॅब असणं अगोदरच गरजेचं होतं का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.