पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअभियंता पत्रकारांच्या नावाखाली घेत आहेत लाखोचा मलिदा प्रामाणिक अधिकाऱ्यांची होतेय बदनामी

pcmc-2

महापालिका बांधकाम विभागाचे उप अभियंता पत्रकारांच्या नावाखाली घेत आहेत लाखोचा मलिदा प्रामाणिक अधिकाऱ्यांची होतेय बदनामी

पिंपरी (प्रतिनीधी) पैश्याची चटक लई वाईट, ती चटक काहीही करायला लावते असे सांगितले जाते, त्याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी विभागाचे उप अभियंता हे बिल्डर्स आणि आर्किटेक यांना पत्रकारांच्या नावाखाली त्रास देऊन लाखोची वसुली करतात त्यामुळे विशिष्ट उपाअभियंता मुळे बाकीच्या प्रमाणिक उपअभियंता यांची नाहक बदनामी होत आहे

पिंपरी चिंचवड महानगरपालिका बांधकाम विभाग नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. अनेक वेळा वर्तमान पत्रामध्ये उलट सुलट बातम्या प्रकाशित होतात मात्र निगरगट्ट बनलेले अधिकारी अजिबात घाबरताना दिसत नाहीत.

महापालिका बांधकाम परवानगी विभागात शहरातील विविध भागातून बांधकाम परवानगी घेण्यासाठी अनेक आर्किटेक्ट, बिल्डर तसेच नागरिक नियमित येत असतात, याच विभागातील काही अधिकारी येणाऱ्या नागरिकांचे काम प्रामाणिकपणे करतात मात्र काहीजण येणारा नागरिक हा कसा अडचणीत येईल, त्याचे काम जास्तीत जास्त कसे अडचणीचे होईल, त्याच्या फाईलमध्ये जास्तीत जास्त त्रुटी काढून जास्त पैसे कसे लाटावे यासाठी अनेक नामी युक्त्या लढवून नागरिक, आर्किटेक्ट, बिल्डर यांना अक्षरशः लुटण्याचे काम चालू असल्याचे आर्किटेक्ट खाजगीत बोलत आहेत.

नेमका प्रकार काय आहे? बांधकाम परवानगी विभागात काही अधिकाऱ्यांनी फाईल मंजूर करण्याचे (महापालिकेचा भरणा सोडून) दर अलिखित ठराविण्यात आले आहेत. मात्र ठरविलेले पैसे कमी पडतात की काय? हे निगरगट्ट अधिकारी नवनवीन शक्कल लढवीत आहेत आणि पैसे उकळतात.

असाच एक नवीन प्रकार उघडकीस आला असून जास्त पैशाच्या हव्याशापोटी दोन अधिका-यांनी मिळून ओळखीच्या पत्रकाराकडून त्याचे लेटरहेड मागून घेऊन त्यावर स्वतः मजकूर लिहून सदरील पत्र संबंधित आर्किटेक्टला दाखविले. आणि तुझे काही खरे नाही. तुझ्या प्रकल्पातील चुकीच्या कामाबाबत पत्रकाराला समजले आहे.

त्यामुळे तुझ्या जडचणी वाढतील त्यामुळे तू त्या पत्रकाराला पैसे दे. अशा दम देऊन त्याच्याकडून लाखो रुपये उकळले असून या पैशामधून भरपूर पैसे स्वतःकडे ठेऊन घेऊन प्रकरण मिटवल्याची माहिती, पत्रकारांना समजताच या पैसे खाण्यासाठी पत्रकारांचा वापर करणाऱ्या पत्रकार अधिकाऱ्याबाबत मंडळीमध्ये तीव्र नाराजी पसरली आहेत. ..

आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर संबंधित आर्किटेक्टने थेट महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केल्याने बांधकाम विभागातील या निगरगट्ट आणि मस्तवाल अधिकाऱ्याबाबत कमी व्हावा अशी भावना या विभागात प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी व्यक्त करत विभागात चर्चा सुरु आहे.

बांधकाम विभागाबाबत सुरु असलेली बदनामी थांबावी, नागरिक, बिल्डर यांचा त्रासया विभागाचे काही जेई, उपअभियंता एवढे निर्धावलेले आहेत की त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर चक्क मंत्राल्यातून रात्री खासदार, आमदार यांचा दबाव टाकत असल्याने वरिष्ठ अधिकारीली हतबल झाले असल्याची चर्चा सुरु आहे.