दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टच ठरले संकटमोचक,,किराणा साहित्यासह कपडे देऊन जपली बांधिलकी

Oplus_131072

दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टच ठरले संकटमोचक
किराणा साहित्यासह कपडे देऊन जपली बांधिलकी
शिरूर कासार : मागील आठवड्यातीलअतिवृष्टीमुळे सिंदफना नदीला महापूर येऊन अनेकांचे संसार वाहून गेल्याने त्यांचा आधार हिरावला आहे
. रविवारी पिंपरी चिंचवड भागातील विशालनगर येथील दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शिरूर येथे येऊन किराणा साहित्य, कपडे भेट देत संकटकाळी मदत केल्याने ते ‘संकटमोचक’ आहेत. ठरलेपिंपरी चिंचवड भागातील विशालनगर येथीलऑक्टोबर रोजी शिरूरमध्ये वस्तूंचे वाटपपिंपरी चिंचवडच्या विशालनगरातील दक्षीणमुखी हनुमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी शिरूर येथील पुरग्रस्तांना किराणा साहित्य, कपडे भेट दिले.
दक्षिणमुखी हनुमान ट्रस्ट सामाजिक कार्यात अग्रेसर असून, या ट्रस्टला शिरूर येथील महापुरामुळे ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची माहितीमिळताच रविवारी अनिलसेठ संचेती, संजय केदारे, सतीश गायकवाड, शैलेश केदारे, दत्तात्रय गायकवाड यांनी पुणे येथून टेम्पो भरून किराणा किट व कपडे असे साहित्य शिरूरमध्ये आणले.बाजार तळावर नगरपंचायतचेएक छोटीशी मदत केलीआपद्ग्रस्तांना मदत करणे हे आमच्या ट्रस्टचे वैशिष्ट्य आहे. सामाजिक कामात आमचा ट्रस्ट नेहमीच अग्रेसर असते
. बीड जिल्ह्यातील शिरूर येथील अतीवृष्टीमुळे निर्माण झालेली पुर परिस्थीती गंभीर होती. ती पाहून आम्ही एकत्र येत एक छोटीसी मदत केली आहे. याचे समाधान आम्हाला वाटते, असे विशालनगर येथील दक्षिणमुखी हनुमान ट्रस्टचे अनिलसेठ संचेती यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले.बांधकाम सभापती अरुण भालेराव, नगरसेवक अमोल चव्हाण, व्यापारी किरणशेठ देसरडा यांच्या सहकार्याने साहित्य वाटप करीत माणुसकीचा ओलावा दाखवला.