21 डिसेंबरला एकाच दिवशी निकाल- हायकोर्ट

(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना) च्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबर 2025 रोजीच जाहीर केले जातील. 20 डिसेंबरला उर्वरित नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासानेच एक्झिट पोल जाहीर करता येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिताही 20 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. (Election Results)या निर्णयामुळे राज्यभरातील उमेदवार, पक्षकार आणि प्रशासनाला एकत्रित निकाल प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः आधीच मतदान पूर्ण झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निकालाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. एकाच दिवशी सर्वत्र निकाल लागणार असल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.निकालाची तारीख वाढवल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सर्व स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रे 21 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे सुरक्षित ठेवावी लागणार आहेत. जवळपास 280 ठिकाणी निवडणूक होत असल्याने 280 हून अधिक मतमोजणी केंद्रे प्रत्यक्षात 21 तारखेपर्यंत राखीव ठेवावी लागतील. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणांवर तैनात ठेवणे बंधनकारक ठरणार आहे.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत आज एक मोठा निर्णय समोर आला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याचे आदेश दिले असून, सर्व नगरपरिषदांच्या निकालासाठी नवीन तारीख निश्चित केली आहे. यामुळे आधीच तणावात असलेल्या प्रशासनासोबत उमेदवारांमध्येही नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आज मतदान झालं असलं, तरी त्याचा निकाल उद्या जाहीर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Election Results)स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवताना, निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचारी यांनी दररोज पाहणी करून स्वाक्षरी करणे ही प्रक्रिया देखील 21 तारखेपर्यंत अखंड सुरू राहील. सामान्यतः विधानसभेची मतमोजणी मतदानानंतर एक-दोन दिवसांत होत असली, तरी आता जवळपास तीन आठवड्यांसाठी प्रशासन व पोलिसांची यंत्रणा व्यस्त राहणार आहे.या निर्णयाचा संबंध आधीपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध नगरपरिषदांच्या प्रकरणांशी आहे. जवळपास 20 नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया 20 डिसेंबरला होणार असल्याने सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने हा मुद्दा मान्य करत एकाच दिवशी मतमोजणी जाहीर करणे योग्य ठरेल, असा निर्णय सुनावला आहे.
