दीपक भोंडवे यांच्या पुढाकाराने रावेत येथे नवीन पोस्ट ऑफिसचे दिमाखदार उद्घाटन

नवीन पोस्ट ऑफिसमुळे रावेतकरांच्या दैनंदिन जीवनातील अनेक सुविधा अधिक सुलभ होणार : आमदार शंकर जगताप
पिंपरी-चिंचवड (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना): चिंचवड विधानसभा परिसरातील रावेत येथील चंद्रभागा कॉर्नर येथे नवीन रावेत उप डाकघर पोस्टचे दिमाखदार उद्घाटन आज, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले. हा उपक्रम रावेत, किवळे, आदर्शनगर परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि सुविधा केंद्रित पाऊल म्हणून पाहिला जात आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन रावेत उप- डाकघर यामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक सुविधा अधिक सुलभ होणार आहेत.
उद्घाटनानंतर बोलताना आमदार शंकर जगताप यांनी ‘जनसेवा’ या संकल्पनेवर जोर दिला. ते म्हणाले, ”जनसेवेचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा आपण समाजाला सुविधा, विश्वास आणि प्रगतीचा दृढ आधार देतो. हे नवीन पोस्ट ऑफिस रावेतकरांसाठी अनेक सेवांच्या उपलब्धतेचा केंद्रबिंदू बनेल, यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला फायदा होणार आहे.” जनतेच्या सोयीसाठी आणि त्यांना प्रशासकीय सेवा जलद मिळाव्यात, यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे सचिव आणि युवा नेते दीपक मधुकरराव भोंडवे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. त्यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून देऊन समाजसेवेची खरी जाणीव दाखवली, जी त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक आहे.
श्री. भोंडवे आपल्या भाषणात म्हणाले, ”समाज हितासाठी काम करताना आपल्याला निष्ठा आणि समर्पण ठेवणे गरजेचे आहे. या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून स्थानिक लोकांना जलद, विश्वसनीय आणि आधुनिक प्रशासन सेवा मिळतील.”
त्यांच्या या कृतीतून, युवा नेतृत्वाचा समाजाभिमुख दृष्टिकोन ठळकपणे समोर आला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, प्रसिध्द उद्योजक एन. बी. भोंडवे, संत तुकाराम साखर कारखाना संचालक धोंडीबा भोंडवे, माजी संचालक मधुकर भोंडवे, उद्योजक सोमनाथ भोंडवे, माजी नगरसेवक बाळासाहेब तरस, अधीक्षक दिलीप सर्जेराव, उप अधीक्षक दत्तात्रय वराडी, डाक सेवा उप अधीक्षक मुन्ना कुमार, दिलीप राऊत, धर्मपाल तंतरपाले, भाजपा मंडल अध्यक्ष मोहन राऊत, माधुरी सावळे, ॲड. प्रितीसिंग परदेशी, दादा तरस, काशिनाथ भोंडवे, पोलीस पाटील बाळकृष्ण भोंडवे, रामभाऊ भोंडवे, कुणाल भोंडवे, अमोल भोंडवे, प्रदीप बिजगे, सिंधू तंतरपाळे, जयाताई राऊत, संतोष म्हस्के, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सुरेश भोंडवे, उपाध्यक्ष महेश साळुंखे, सचिन गावडे, निखिल जाधव, शैलाताई भोईर, अलका पांडे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सतेशकुमार चौधरी, श्री. पंढरीनाथ सानप, श्री. डोईफोडे, अजय भोंडवे, किसन भोंडवे यांच्यासह भजनी मंडळ संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सोसायटीचे पदाधिकारी,
स्थानिक नागरिक, विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती लाभली होती. या नवीन पोस्ट ऑफिसमुळे पार्सल, पत्रव्यवहार, विविध शासकीय योजना आणि इतर पोस्टल सेवा आता अगदी जवळ उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार शंकर जगताप आणि युवा नेते श्री. दीपक भोंडवे यांची जनहितासाठी कार्यरत राहण्याची तीव्र इच्छा आणि उमेद स्पष्ट झाली आहे. यापुढेही रावेत आणि चिंचवड विधानसभा परिसराच्या विकासासाठी हे दोन्ही नेते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हे पोस्ट ऑफिस परिसरातील सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण भर टाकणार असून, ‘सुविधा, विश्वास आणि प्रगती’ या त्रिसूत्रीवर आधारित जनसेवेच्या धोरणाला बळकटी देणारा हा एक मोठा टप्पा ठरला आहे.
