पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेलाही मोठे खिंडार…

ps logo rgb

खा. बारणे यांचा उजवा हात राजेश आरसूळ दोन हजार कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

पिंपरी ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना पिंपरी चिंचवड शहरात मोठमोठ्या राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. गेली काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्के बसत असताना आता शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षाचे पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख राजेश आरसूळ यांनी आपल्या दोन हजार कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
गेली काही दिवस पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आघात करण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टीने चिंतेची बाब निर्माण झालेली होती पिंपरी चिंचवड शहर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातातून निसटते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती.
परंतु आता अजित पवार यांनीही भाजपावर पडतवार करण्यास सुरुवात केली असून शिवसेना शिंदे गटालाही त्यांनी सोडले नाही. आज शिवसेना शहर उपप्रमुख राजेश आरसूळ व त्यांच्या पत्नी सौ मनीषा राजेश आरसूळ यांनी अजित पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक प्रमुख नाना काटे नगरसेवक भाऊसाहेब भोईर आदी प्रमुख ही उपस्थित होते.
पुण्यात झालेल्या या पक्षप्रवेशावेळी राजेश अडसूळ यांचे जवळपास 2000 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे.
राजेश आरसूळ व सौ मनीषा राजेश आरसूळ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशामुळे वाल्हेकर वाडी, चिंचवडे नगर प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पॅनल मजबूत झाले असून या प्रभागातील भाजपच्या दिग्गजांना मोठा धक्का बसणार असे चित्र निर्माण झाले आहे.
या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौ मनीषा राजेश आरसुळ यांना शुभेच्छा देत त्यांच्यासारख्या युवा व अभ्यासू उमेदवारामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला मौलिक हातभार लागेल असे मत व्यक्त केले
सौ मनीषा राजेश अडसूळ यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या शहराचा दैदिप्यमान विकास करणाऱ्या नेतृत्वास सोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासारख्या तरुण महिला कार्यकर्त्याला अभिमानाची बाब आहे.
नगरसेवक भाऊसाहेब भोईर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रमुख नाना काटे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते असेही सौ मनीषा राजेश आरसूळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Latest News