एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!

ps logo rgb

पिंपरी चिंचवड: ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार पिंपळे गुरव येथे करण्यात आला . निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली “100 पार”चा संकल्प पूर्ण करू असा निर्धार देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.21) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील किनारा बँक्वेट हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आमदार शंकर भाऊ जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी “100”पार संकल्पचा पुनरुचार केला.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेली कामे नागरिकांसमोर घेऊन जावे. राज्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासात्मक, प्रगतशील महाराष्ट्राचे चित्र नागरिकांसमोर उभे करावे असे आवाहन शंकर जगताप यांनी केले. 2017 पासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून अनेक कामे पूर्णत्वाला गेली आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, रस्त्यांचे जाळे, अत्याधुनिक, वेगवान मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, शिक्षणाचा उंचावलेला दर्जा अशा माध्यमातून आपण शहराचा परिपूर्ण विकासाचा आलेख उंचावत आहोत हे नागरिकांसमोर ठेवा असे आवाहन देखील आमदार शंकर जगताप यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, आता या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. बूथ स्तरापासून मंडल, ते शक्ती केंद्र प्रमुखांपर्यंत सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आजच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती ठरवले असल्याचे सांगण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात काटेकोर नियोजन करून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
……………..

कार्यकर्त्यांचा निर्धार “100” पार चा पुनरुच्चार

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, भाजपाच्या माध्यमातून 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. आयटी सीटीपासून ते आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू असून, हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी शहरात भाजपचे धोरणात्मक आणि सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे.
“एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनेच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सक्षमपणे पार पाडू,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीने काम करेल, असा निर्धारही करण्यात आला. कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध नियोजन आणि जनतेशी थेट संवाद यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल.

शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख

Latest News