तरुणांनी व्यवसायात झेप घ्यावी – संदीप वाघेरे यांचे आवाहन

sandip-waghere

तरुणांनी व्यवसायात झेप घ्यावी – संदीप वाघेरे यांचे आवाहन पिंपरी :तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागता व्यवसायात झेप घ्यावी असे आवाहन माजी नगरसेवक व प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले.

पारखे बंधू यांच्या नूतनीकरण केलेल्या वडापाव सेंटरचे उद्घाटन संदीप वाघेरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शशिकांत घुले, प्रवीण कुदळे, अक्षय नाणेकर, नितीन गव्हाणे, राजेंद्र वाघेरे, बाळू दरेकर, सोनू कदम आदी उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीतही संदीप वाघेरे यांनी कार्यक्रमास येऊन आपल्याला व्यवसायासाठी प्रेरणा दिली याबद्दल पारखे बंधू यांनी वाघेरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Latest News