संकल्प विकासाचा, तुतारी नाद विजयाचा: विकासाच्या मुद्यांवर व प्रगत प्रभागाच्या ‘ब्ल्यूप्रिंट’वर विजय निश्चित!

पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्र. २८ मध्ये विशाल अनंतराव जाधव यांचा विश्वास.
जोरदार शक्तीप्रदर्शन करीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल.
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
“पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ऐतिहासिक विकासकामे झाली आहेत. या विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग २८ मधून ‘तुतारी’ वाजवणारा निष्ठावान उमेदवारच विजयी होईल, असा ठाम विश्वास विशाल अनंतराव जाधव यांनी व्यक्त केला.”
आज शनिवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष विशाल अनंतराव जाधव यांनी आपल्या हजारो समर्थकांसह प्रभाग क्र. २८ (पिंपळे सौदागर-रहाटणी) मधून आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात आणि शक्तीप्रदर्शनाने दाखल केला.
भक्ती आणि शक्तीचा संगम:
अर्ज भरण्यापूर्वी विशाल जाधव यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाबोधी बुद्ध विहार येथे जाऊन बुद्ध वंदना घेतली आणि संवैधानिक हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर ग्रामदैवत श्री मुंजोबा मंदिरात अभिषेक व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पास नतमस्तक होऊन त्यांनी प्रचाराचा ‘तुतारीनाद’ केला. हलगी आणि पिपाणीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
मान्यवरांची उपस्थिती:
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव, धनगर समाजाचे नेते दशरथ आबा राऊत, भटक्या विमुक्त समाजाचे नेते संजय कदम यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जनसंपर्काचा धडाका:
गेल्या १५ दिवसांपासून विशाल जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता जाधव यांनी फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर गावठाण, कुणाल आयकॉन, रोझ लॅक, गोविंद गार्डन यांसारख्या प्रमुख वस्त्यांमध्ये पदयात्रा काढून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. एक कार्यक्षम, नागरिकाभिमुख आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया:
”माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि राहणीमान उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. समोर असलेल्या समस्यांचे निराकरण करून प्रगतीची नवी दिशा दाखवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. पिंपळे सौदागर-रहाटणीसह शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही ‘विकासाची ब्ल्यूप्रिंट’ तयार केली असून, जनतेच्या एकजुटीने हा विजय आम्ही खेचून आणू!”
— विशाल अनंतराव जाधव
(उमेदवार व शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग, पिंपरी-चिंचवड)
