मी समस्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणेकरांना अभिवादन करतो…

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पूर्व पुण्याच्या राजकारणात यंदाच्या महापालिका निवडणुकीत मोठा उलटफेर घडला असून, पुर्व पुण्यात सुरेंद्र पठारे यांनी स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. पारंपारिक आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वडगाव शेरी, वाघोली, येरवडा या भागात कमळ फुलले आहे. सोबतच सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब देखील झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करून पठारेंनी केवळ विजयच नाही तर दोन्ही पॅनल लीडने जिंकून राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. या विजयामागे सुरेंद्र पठारे यांची रणनीती, संघटन कौशल्य आणि जनसंपर्क निर्णायक ठरला आहे. दुसरीकडे या भागात भाजपची ताकद देखील वाढली आहे.भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या भागावर यंदा विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यादृष्टीने नवीन चेहरा तसेच तरुण पिढीला साथीला घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यातच निवडणुकीपूर्वी सुरेंद्र पठारे यांना भाजपात प्रवेश देऊन राष्ट्रवादीला मोठा झटका दिला होता. दुसरीकडे भाजपने सुरेंद्र पठारे यांच्यावर विश्वास दाखवत प्रभाग क्रमांक ३ आणि ४ ची संपूर्ण जबाबदारी सुरेंद्र पठारे यांच्याकडे सोपवली होती.राज्यात आज मुंबई, पुणे सह 27 महानगरपालिकांचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुंबईत अजूनही मतमोजणी सुरू आहे. मात्र पुणे महानगरपालिकेवर भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. हरात भाजपने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला केवळ 15 जागा मिळताना दिसून येत आहे. पुण्यात अभूतपूर्व यश मिळाल्यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मी सर्वप्रथम सर्व पुणेकरांचे मनापासून धन्यवाद व्यक्तकरतो. भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी इतके मोठे समर्थन दिले. मी समस्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणेकरांना अभिवादन करतो. धन्यवाद देत असताना ही जाणीव नक्की आहे की, प्रत्येक पुणेकराने मत देताना विचार केला असेल, हे मत मी कशाला देतोय, कोणाला देतोय, कोणत्या उमेदवाराला देतोय? त्यामागचा जो विचार होता, तो विचार होता या शहराच्या प्रगतीचा, विकासाचा. सत्ता केवळ राबवण्यासाठी नसून , पुणेकरांनी जी अपेक्षा आमच्याकडून व्यक्त केली आहे, त्या अपेक्षांची पूर्तता करणे यामागची जबाबदारी असणार आहे.”
