नवा उपमुख्यमंत्री कोण? राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या मुंबईत आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) उपमुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त आहे. सुनेत्रा ताईंना ही जबाबदारी देण्याची मागणी रास्त आहे. उद्याच्या बैठकीत जर एकमत झालं, तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीही होऊ शकतो.” त्यामुळे उद्याचा दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. (Ajit Pawar death)दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या मुंबईत सर्व आमदारांची बैठक आयोजित केली असून, या बैठकीतच उपमुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नवा उपमुख्यमंत्री कोण असणार, याबाबत चर्चा रंगली असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्या मुंबईत आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाच्या बहुतांश आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं जात असून, उद्याच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळू शकतो.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी प्रतिक्रिया देत महत्त्वाचं विधान केलं आहे. “अजितदादा गेले, त्यांची उणीव मोठी आहे. पण शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवावा लागतो. उद्या आमदारांची बैठक आहे, त्यात विधीमंडळ पक्षप्रमुख कोण असणार यावर निर्णय होईल,” असं भुजबळ यांनी सांगितलं.
