सीमेवरच्या गावांत घुमला मराठीचा जयघोष या सोबतच मराठी संस्कृती आणि ज्ञानाची पालखी!

ps logo rgb

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पुणे व शारदा प्रतिष्ठान भालकी, बिदर यांच्या संयुक्त विद्यमाने भालकी तालुक्यातील (जि. बिदर) अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ऐतिहासिक आणि ज्ञानरूपी उपक्रम काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा…!” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, सीमावर्ती भागातील मराठी शाळांना आणि शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:
मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान.
सीमेवरच्या गावांत मराठी भाषा टिकवण्यासाठी काम करणाऱ्या शाळांचा गौरव.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याबद्दल जनजागृती.
ग्रामस्थांचा आणि मराठी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पुढील अमूल्य ग्रंथांचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळांना सन्मानित करण्यात आले:
भारताचे संविधान – लोकशाहीच्या मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी.
ज्ञानेश्वरी – आध्यात्मिक आणि मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी.
संत तुकाराम महाराज गाथा – अभंगातून संस्कार रुजवण्यासाठी.
शैक्षणिक साहित्य – विद्यार्थ्यांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी.

मराठी आपली मायबोली आहे आणि ती सातासमुद्रापार नेण्यासोबतच आपल्या शेजारील राज्यांतील सीमावर्ती भागात ती जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हा छोटासा प्रयत्न त्याच संकल्पाचा एक भाग आहे!
सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, शाळा व्यवस्थापनाचे आणि उपस्थित मराठी प्रेमींचे मनःपूर्वक आभार!

  • मार्गदर्शक: श्री. अरुण श्रीपती पवार
    (संस्थापक/अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ)
  • विश्वस्त: श्री. डॉ. दिनकर मोरे.
    (शारदा प्रतिष्ठान भालकी जि. बिदर)

सोबत इतर मान्यवर – ह. भ. प. बब्रुवाहन वाघ महाराज, श्री. सूर्यकांत कुरुलकर, श्री. दत्तात्रय धोंडगे, श्री. प्रा. रविंद्र खांडेकर, श्री सुधाकर थिटे, श्री. किशोर अट्टर्गेकर, श्री. तुकाराम नारायणराव मोरे, श्री. हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, श्री. अमृत अक्रे आणि इतर सहकारी.

Latest News