LPG GAS शहर आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सींना याबाबत सूचना…पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधालकर

gas

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- शहर आणि जिल्ह्यातील गॅस एजन्सींना याबाबत सूचना देण्यात आल्या असून, उपलब्ध गॅस साठा प्रथम अत्यावश्यक सेवांसाठी राखून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हॉटेल, ढाबे, खानावळी तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र अत्यावश्यक सेवा सुरळीत राहाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या असून, अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सध्या कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित करण्यात आला असून, प्राधान्याने केवळ विद्युत दाहिनी (स्मशानभूमी) तसेच रुग्णालयांना गॅस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधालकर यांनी दिली.

पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखले जाते. शिक्षणासाठीराज्यातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी शहरात येतात.याशिवाय रोजगारासाठी अनेक कामगारही शहरात वास्तव्यास असून, मात्र सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असून त्याचा फटका शहरातील हॉटेल,मेस आणि खानावळी व्यवसायाला बसू लागला आहे.दरम्यान, कमर्शियल गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. काही व्यावसायिकांकडून घरगुती सिलेंडर वापरल्याची माहिती समोर येत असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथकेही सक्रिय करण्यात आली आहेत. गॅस एजन्सींच्या साठ्याची पाहणी, वितरणाची प्रक्रिया तसेच गॅसचा वापर कुठे आणि कसा होत आहे याची तपासणी केली जाणार आहे. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही सुधालकर यांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच गॅस सिलेंडरची अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देत गॅस पुरवठा व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Latest News