हार्दिक पंड्या वादाच्या भोवऱ्यात, त्याच्याविरोधात पुण्यात तक्रार…

पुणे | (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. या विजयात हार्दिक पंड्याचाही मोलाचा वाटा होता. सामना जिंकल्यानंतर हार्दिकने आपली प्रेयसी महिका शर्मा हिच्यासोबत मैदानावर जल्लोष करत डान्स केला. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.भारतीय संघाने ICC Men’s T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानावर जोरदार जल्लोष केला. मात्र या जल्लोषादरम्यान हार्दिक पंड्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटना अहमदाबादमध्ये घडली असली तरी राष्ट्रध्वज हा संपूर्ण देशाचा प्रतीक असल्यामुळे तक्रार कुठल्याही पोलिस स्थानकात नोंदवता येते, असे तक्रारदारांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तक्रार स्वीकारत पुढील चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिस काय कारवाई करणार आणि हार्दिक पंड्या यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.जल्लोष करत असताना हार्दिक पंड्याने भारतीय ध्वज आपल्या अंगाभोवती गुंडाळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाच्या नियमांच्या विरोधात असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.या प्रकरणी वकील वाजिद खान यांनी पुण्यातील Shivajinagar Police Station Pune येथे तक्रार दाखल केली आहे. ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ च्या कलम २ चा हवाला देत हार्दिक पंड्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
