पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांच्या पार्कींगची सुविधा समोर असलेल्या करण्यात यावी:- युवराज दाखले

pcmc-2

पिंपरी – (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) प्रतिनीधी,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कर दाते नागरीक आपले प्रश्न घेऊन महानगपालिकेत येत असतात परंतु पार्कींगचा अभाव असल्याने नागरिकांना बाहेर रोडवर स्वताची वाहनं पार्किंग केल्यास आर टी ओ प्रशासन हजारो रूपयांच्या नो पार्किंगच्या पावत्या करतात ही बाब आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, स्वतःहा गांभीर्याने दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील ग्रेडसेप्रेडरवर गडरच्या साह्याने वाहन पार्किंग तयार करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी व महापौर रविभाऊ लांडगे,स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे , विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या कडे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Latest News