आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले- गझलकार म.भा.चव्हाण

पिंपळे गुरव: (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -काव्यात्मा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पिंपळे गुरव येथे लेखक श्रीकांत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला . विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इरान्ना निंबाळ (काव्य साधना जीवन गौरव पुरस्कार), निलेश शेंबेकर (गझलकार प्रकाश बनसोडे सन्मान पुरस्कार), युवा कवी उमेंद्र बिसेन (काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार), संभाजी रणसिंग (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), संदिप तापकीर (काव्यात्मा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार),संजय मलवाड (काव्यात्मा आदर्श शिक्षक पुरस्कार), संतोष खवळे (काव्यात्मा युवा उद्योगरत्न पुरस्कार), राजू जाधव ( श्रमप्रतिष्ठा पुरस्कार) या म.भा.चव्हाण यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी लेखक श्रीकांत चौगुले अध्यक्षिय भाषणात म्हणाले, सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे साहित्य टिकावू असते.
प्रत्येकजण सूर्य होऊ शकत नाही
मी माझा काजवा होऊ शकतो, प्रत्येकजण आपला परिघ बदलू शकतो पण बदलाची सारी ताकद लेखणीत आहे याचे भान असले पाहिजे तरच प्रेम शांतीची क्रांती माणसाला माणूस म्हणून समजून घेईल. समाजाचा समतोल साधणारा विचार देताना
म.भा.म्हणाले
आज माझे झाड झाले
दुःख दृष्टी आड झाले
या पंक्ती नंतर ते एवढेच म्हणाले,” सामुदायिक निर्भयतेची गरज आहे
यावेळी अध्यक्ष श्रीकांत चौगुले, गझलकार म.भा.चव्हाण ,वृक्षमित्र अरुण पवार ,व्यंकटराव वाघमोडे, लहू काळे,संजय साळुंखे होते.वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले,” घरात जेवढी माणसे तेवढे झाडे लावली पाहिजेत “. वेडे साहित्यिक, शिक्षकच खऱ्या अर्थाने क्रांतीचे जनक आहेत अशा भावना वाघमोडे गुरुजींनी व्यक्त केल्या.शब्द आणि रेषांच्या माध्यमातून चांगला समाज आपण घडवत राहू असे व्यंगचित्रकार लहू काळेंनी मत व्यक्त केले. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे यांनी तर सुत्र संचालन प्रतिमा काळे यांनी केले.
काव्यात्मा निमंत्रित कवी संमेलन कवी, गझलकार आप्पा कसबेकर यांच्या अध्यक्षतेखाली शानदार पणे पार पडले
यावेळी आप्पा मनोगतात म्हणाले, ” चांगले काम करणाऱ्या संस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे तरच साहित्यिक संस्थेला नवसंजिवनी मिळेल
तेव्हाच गडद अंधाराला पराभूत करणारी कविता प्रेमाचा संदेश देताना दिसून येईल.मनातील शब्दांची उकल झाल्याशिवाय जीवनात आनंद मिळणार नाही म्हणून प्रत्येकाने कवी मन जपलं अशी पुष्टी माजी पोलिस अधिकारी असणारे कवी आप्पा कसबेकर यांनी जोडली.यावेळी उपस्थित कवी , कवयित्री यांनी विविध विषयांवर कविता सादरीकरण करुन समाजात ऐक्याची भावना महत्वाची भूमिका असते.यावेळी प्रमोद जगताप ,प्रा.माया मुळे,राधाताई वाघमारे,सुहास घूमरे, शोभाताई जोशी,अशोक वाघमारे, रशिद अत्तार,महेमूदा शेख , प्रकाश गायकवाड, योगिता कोठेकर,प्रतिमा काळे ,अनिल नाटेकर,धनंजय इंगळे,विजय जाधव सहित जवळपास ३५ कवी/कवयित्री यांनी कविता सादर केल्या.दादाभाऊ ओव्हाळ यांनी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन कवी दत्तू ठोकळे यांनी केले.
