चाकण मध्ये खड्यांनी एका महिलेचा जीव घेतला.

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)
चाकाखाली चिरडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चाकण एमायडीसीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चाकण एमआयडीसीतील खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे गेल्या एका वर्षात तब्बल ३९९ जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने मृत्यू –
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे ते स्पायसर चौक या मार्गावर सॅनी इंडिया कंपनीजवळ अपघाताची ही घटना घडली. महिला दुचाकीवरून घरी निघाली होती. दुचाकी घसरून महिला रस्त्यावर पडली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने महिलेला जोराची धडक दिली. चाक अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. सानवी सचिन पांचाळ (वय ४२ वर्षे) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव होते.
खड्यांनी घेतला महिलेचा जीव –
पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था आता जीवघेणी ठरत आहे. रस्त्यांवरील खड्यांनी एका महिलेचा जीव घेतला. चाकण येथील एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेची दुचाकी खड्यांमुळे घसरली. रस्त्यावर पडलेल्या या महिलेला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
ही महिला स्कोड़ा कंपनीत सिक्युरिटी फोर्समध्ये काम करत होती. या अपघाताची माहिती मिळताच महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सानवी पांचाळ ही कामगार महिला तिच्या दुचाकीवरून कंपनीतून सुटल्यानंतर घरी जात होती. पुणे-नाशिक महामार्गावरील स्पायसर चौक या बाजूकडे ती महिला येत होती. दुचाकीवरून जात असताना तिची दुचाकी चिखल आणि खड्यामुळे घसरली.
त्यामुळे ती रस्त्यावर पडली. त्यानंतर पाठीमागून आलेल्याट्रकने तिला चिरडले.
वाहनाचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सानवी पांचाळ ही महिला तिच्या कुटुंबीयासह भोसरीतीस इंद्रायणीनगर येथे राहत होती. या दुर्दैवी घटनेने अनेकांनी संताप व्यक्त केला. अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेला. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत असून वाहन चालकाचा शोध घेत आहे.
