PUNE आरोग्य विभागात एकूण 1600 मंजूर पदे, त्यापैकी केवळ 1019 पदांवर कर्मचारी कार्यरत असून 581 पदे रिक्त

pune PMC

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

याशिवाय वर्ग-१ आणि वर्ग-२ मधील अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदेही निर्णयप्रक्रिया आणि सेवा व्यवस्थापनावर परिणाम करत आहेत, वर्ग-४ मधील कर्मचाऱ्याऱ्यांची कमतरता रुग्णालयांतील सहाय्यक सेवांवर परिणाम करत असल्याचे चित्र आहे.पावसाळ्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आणि इतरसंसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असताना आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे.

सर्वाधिक रिक्त पदे वर्ग-३ मध्ये असून या संवर्गातील कर्मचारी आरोग्य केंद्राचे दैनंदिन कामकाज, लसीकरण, रोगनियंत्रण, प्रयोगशाळा सेवा आणि प्रशासकीय कामकाजात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे या पदांची कमतरता आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी ठरत आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल ५८१ पदे रिक्त असल्याचे समोर आले असून, याचा थेट परिणाम शहरातील सार्वजनिक आरोग्य सेवेवर होत आहे. डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे महापालिकेची रुग्णालये, प्रसूत्तिगृहे, दवाखाने तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर अतिरिक्त ताण पडत आहे.वाढती लोकसंख्या आणि संसर्गजन्य आजारांचे आव्हान लक्षात घेता रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, आरोग्य विभागात एकूण १,६०० मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ १,०१९ पदांवर कर्मचारी कार्यरत असून ५८१ पदे रिक्त आहेत.

संवर्गनिहाय रिक्त पदांची माहिती

वर्ग-१: १४५ पैकी ३८ पदे रिक्त
वर्ग-२: २६९ पैकी ८८ पदे रिक्त
वर्ग-३: ८७१ पैकी सर्वाधिक ३७३ पदे रिक्त
वर्ग-४: ३१५ पैकी ८२ पदे रिक्त

महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील पदांची सद्यस्थिती अशी आहे: एकूण मंजूर पदे १,६००, कार्यरत कर्मचारी १,०१९ आणि रिक्त पदे ५८१ आहेत

एकूण मंजूर पदे १,६००,
कार्यरत कर्मचारी १,०१९ आणि
रिक्त पदे ५८१

Latest News