रिक्षा चालकांना दिलासाः पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्यासाठी 25 रुपयांऐवजी 30 रुपये मोजावे लागणार…

पुणे-पिंपरी (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या दीड किलोमीटरच्या (१.५ किमी) टप्प्यासाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यात थेट ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यापुढील प्रति किलोमीटर प्रवासासाठी आधी १७ रुपये आकारले जात होते, तो दर आता २० रुपये प्रति किलोमीटर करण्यात आला आहे.
रिक्षा चालकांना दिलासाः गेल्या काही काळापासून वाढलेली इंधनदराची महागाई आणि रिक्षाच्या देखभालीचा खर्च लक्षात घेता रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो रिक्षाचालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. १ सप्टेंबरपासून या नवीन भाडेदरांची अमलबजावणी संपूर्ण शहरात केली जाणार आहे. चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून रिक्षा प्रवास महागणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) या अधिकच्या भाडेवाढीला अधिकृत मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षाने प्रवास करणे महागणार आहे.
असे असतील नवे रिक्षा दरः

